सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले, कलंबिस्त, सांगेली, शिरशिंगे, सावरवाड पंचक्रोशीत दूरसंचार विभागाचे तीन टॉवर्स आहेत. पण दूरसंचार ची रेंजच मोबाईलला नसल्याने या पंचक्रोशीत दूरसंचार विभागाचे सिमकार्ड आम्हाला नको. तात्काळ सिम कार्ड बदलणार, अशी भूमिका या पंचक्रोशीतील दूरसंचार ग्राहक नागरिकांनी केली. गेले काही महिने या भागात रेंजच मिळत नाही. मग आम्ही दूरसंचारचे सिमकार्ड रिचार्ज करायचे कशाला? असा सवाल व्यक्त करत या पंचक्रोशीतील दूरसंचार सेवेच्या एकंदरीत सावळ्या गोंधळाबाबत वेर्ले गावातील ग्रामस्थ एकवटत आज मंगळवारी सावंतवाडी येथील दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावा घातला. ही पंचक्रोशी सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात या गावात दूरसंचार चे मोठ्या संख्येने ग्राहक आहेत. परंतु तेथे दूरसंचार विभागाचे रेंजच मिळत नाही. त्यामुळे या भागात अनेक कामे रेंगाळत आहेत. जर का येत्या आठ दिवसात मोबाईल टॉवर वरून रेंज उपलब्ध न झाल्यास या पंचक्रोशीतील सर्व टॉवर ग्रामस्थ बंद पाडतील. सिम कार्ड दूरसंचार कार्यालयाकडे जमा करतील. असा इशारा ग्रामस्थांनी देताच दूरसंचार विभागाचे मोबाईल विभागाचे अधिकारी मनोज मातुर व मंडल एन एस गायकवाड यांनी येत्या २५ जुलैला वेर्ले गावात असलेल्या मोबाईल टॉवरची पाहणी केली जाईल व तेथे फोरजी ची सिस्टीम तपासण्यात येईल आणि ज्या भागात रेंज मिळत नाही. तेथे असलेला बिघाड दुरुस्त करण्यात येईल व या पंचक्रोशीत यापुढे असलेल्या सर्व टॉवर्स ना रेंज कशी उपलब्ध होईल या दृष्टीने टीम पाठवण्यात येईल. असे आश्वासन दिले.
त्यानंतर घेरावा मागे घेण्यात आला. वेर्ले गावात मोबाईलचा टॉवर उभारून तीन वर्षे झाली. परंतु तेथे टू जी थ्री जी फोर जी अशी कुठलीही रेंज मिळत नाही. वारंवार दिवसाच्या विभागाला कळवू नाही. कोणतीच दखल घेतली जात नव्हती जवळपास ७०० हून अधिक दूरसंचार चे ग्राहक या गावात आहेत. तसेच या पंचक्रोशीत दोन हजाराहून अधिक मोबाईल ग्राहक आहेत. तसेच कलंबिस्त, सांगेली या भागातही टॉवर आहे पण व्यवस्थित तरसंचारची रेंज मिळत नाही. जिओ आयडिया आधी कंपनीच्या मोबाईल ना रेंज मिळते आणि दूरसंचारच्या सिम कार्ड ला रेंज कशी काय नाही? सवाल व्यक्त करत आज संतप्त गाववासीयांनी एकवटत उपसरपंच मोहन राऊळ सामाजिक कार्यकर्ते डॉ संजीव लिंगवत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दिलीप राऊळ, माजी उपसरपंच चंद्रकांत राणे, प्रसाद गावडे, नारायण राणे, राजन राणे, पुंडलिक कदम यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी दूरसंचार विभागाच्या कार्यालयाला धडक दिली. अधिकारी यांना घेरावा घातला.