दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले आहे. देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मणिपूरवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला मोदी उत्तर देत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या नागरिकांनी सरकारच्या प्रति कायम विश्वास दाखवला आहे. मी देवाचे आभार मानतो की, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची त्यांनी बुद्धी दिली. जनता आमच्या सरकारसोबत उभी आहे, विविध विधेयके आम्ही संसदेत पारित केली. आज मी जनतेचे आभार मानण्यासाठी संसेदत उभा आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.