Home स्टोरी आसोली गावात एमएससीबी कडून इलेक्ट्रिक वाहिनीची साफसफाई!

आसोली गावात एमएससीबी कडून इलेक्ट्रिक वाहिनीची साफसफाई!

349

सावंतवाडी प्रतिनिधी: बुधवार दि.९ ऑगस्ट रोजी रोजी एम.एस.सी.बी. तर्फे इलेक्ट्रिक आसोली गावातील विद्युत वाहिन्यांची साफसफाई करण्यात आली. आसोली ग्रामपंचायत कार्यालयात MSCB चे अधिकारी डी. वाय. श्री वाघमोडे आणि विहीरे यांना बोलावून घेऊन गावातील सततचा खंडित होणारा वीज पुरवठा यावर ग्रामस्थांच्या मदतीने १ ऑगस्ट रोजी चर्चा करण्यात आली होती.  त्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन श्री. वाघमोडे यांनी काही गोष्टी आपण लवकरात लवकर करून घेऊ ज्यामुळे या कमी कमी होतील असे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रथम गावातील  महत्वाचे काम म्हणजे विद्युत वाहिनीला लागणारी झाडे  MSCB च्या अधिकाऱ्यांनी क्रेन च्या साहाय्याने तोडून विद्युत वाहिनीला होणारा अडथळा दूर केला. गावातील या कामासाठी ग्रामस्थांनी पण खूप चांगले सहकार्य केले. तसेच आणखी विद्युत वाहिनीला लागत असलेली झाडी लवकरच साफ करण्यात येईल असे MSCB च्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या कार्याबद्दल एमएससीबी अधिकारी आणि कर्मचारी यांचा आसोली गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.