- १० ऑगस्ट वार्ता: भारताचे ‘चंद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेत पोचून ५ दिवस झाले असून ९ ऑगस्ट या दिवशी त्याने पुढील टप्प्यात पर्दापण केले. आता चंद्रयान ३ हे किमान १७४ किमी ते अधिकाधिक १ सहस्र ४३७ किमी अंतरावरून चंद्राला घिरट्या मारत आहे. १४ ऑगस्टला ते चंद्राच्या अधिक जवळ जाणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली.‘चंद्रयान ३’ हे २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रावर यशस्वीरित्या उतरेल, अशी इस्रोच्या वैज्ञानिकांसह भारतवासियांना आशा आहे.