Home स्टोरी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, चिदानंद रेडकर, दिप स्वार विजेते!

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, चिदानंद रेडकर, दिप स्वार विजेते!

127

सावंतवाडी प्रतिनिधी: मुक्ताई ॲकेडमीने कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे वीस वर्षाखालील आणि बारा वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, मालवण येथील बावन्न मुलांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मिलाग्रिस हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका शेराॅन, श्री.पंचम खेमराज काॅलेजचे प्राध्यापक श्री.देशमुख आणि श्री.प्रवीण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

दोन्ही गटात अकरा पारितोषिके, चषक, पदक, प्रशस्तीपत्र देण्यात आली.सहभाग घेणा-या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.स्पर्धेचा निकाल -वीस वर्षाखालील मुलगेपहीला – बाळकृष्ण पेडणेकर, सावंतवाडी दुसरा – मिलिंद सावंत, भिरवंडे, कणकवली तिसरा – राजेश विरनोडकर, सावंतवाडीचौथा – अभिषेक गवस, आंबोली, सावंतवाडीपाचवा – भावेश कुडतरकर, सावंतवाडी बारा वर्षाखालील मुलगे पहीला – विभव राऊळ, सावंतवाडी दुसरा – यश सावंत, कोलगाव, सावंतवाडीतिसरा – सोहम देशमुख, सावंतवाडीचौथा – अर्णव पारकर, फोंडाघाट, कणकवली पाचवा – अवनिश वेंगुर्लेकर, कोलगाव, सावंतवाडी, दहा वर्षाखालील मुलगे विजेता – चिदानंद रेडकर, सावंतवाडी आठ वर्षाखालील मुलगे विजेता – दिप स्वार, कोलगाव, सावंतवाडी.