Home स्टोरी श्रावणात रानटी गवारेड्यांचा वावर!शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण.

श्रावणात रानटी गवारेड्यांचा वावर!शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण.

180

मसुरे प्रतिनिधी: आठ ते दहा रानटी गवारेड्यांचा कळप श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यानेवावर करताना ग्रामस्थांना दिसला. या रानटी गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या जीवाला धोका आहे. त्याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांचे जीवाचं संरक्षण करावे. अशी जनतेची मागणी आहे. श्रावण व गवळीवाडी स्टॉप यांच्यामध्ये असलेल्या इडीच्या ओढ्यावरून हा कळप गवळीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या गवा रेड्यांपासुन ग्रामस्थांनी सतर्क राहणे जरुरीचे आहे. रानटी गवारेडे सिंधुदुर्गात प्रत्येक गावागावात पोहोचल्याने, येथील जनजीवन भयभीत झाले आहे. महाराष्ट्र शासनाने या रानटी जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा यां प्राण्यांपासून सर्वसामान्यांचेही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकताच पोईप येथील एका पडक्या विहिरीत रान गवा रेडा पडल्याची घटना घडली होती.