Home स्टोरी गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणीतून !राजभाषा संचालनालय करणार भाषांतर!

गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणीतून !राजभाषा संचालनालय करणार भाषांतर!

123

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार आहेत. त्यामुळे गोमंतकियांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी हे निकाल इंग्रजीसह मराठीतून उपलब्ध होत होते. कोकणी ही गोव्याची राजभाषा असल्याने राज्यशासन विविध माध्यमांतून कोकणी भाषेचे संवर्धन करत आहे. यातून केलेल्या प्रयत्नांमुळे आता न्यायालयाचा निकाल कोकणी भाषेतून उपलब्ध होणार आहे. गोवा राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने या निकालाचे कोकणी भाषेत भाषांतर केले जाणार आहे.