सावंतवाडी प्रतिनिधी: माडखोल धवडकी येथील अंकुश महादेव सौंदेकर (५५) हे शनिवारी ४ ऑगस्ट पासुन बेपत्ता आहे. त्यांची उंची ५ फूट २ इंच आणि रंग गोरा आहे. अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट त्यावर काळ्या रंगाचे बारीक चौकोन तर निळसर काळ्या रंगाची हाफ पॅन्ट त्यांनी परिधान केली आहे. ते कुणाला आढळल्यास त्यांचे भाऊ बापू सौंदेकर ८३२९५८६०९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.