Home स्टोरी ओसरगाव नं.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन!

ओसरगाव नं.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन!

197

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नं.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सरपंच सुप्रिया कदम, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापक किशोर कदम, शीतल दळवी मॅडम,जगन्नाथ राणे केंद्र प्रमुख विजय मसुरकर , बाळकृष्ण आलव ,प्रतिक्षा चौकेकर, प्रिया जाधव,साळवी ,परब, एमडीएम समन्वयक सावंत मॅडम , उपस्थित होते. शाळेतील मुलांनी भाज्यांची माहिती दिली. सर्व उपस्थित मान्यवरांनी मुलांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचे ऊत्तम सहकार्य लाभले.

शिक्षणं विस्तार अधिकारी मांजरेकर मॅडम म्हणाल्या पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या परिसरात पहायला मिळतात. शरीराला अत्यंत आवश्यक असणा-या या भाज्याचां आपल्या आहारात पालकांनी वापर करावा.व आरोग्य चांगले ठेवावे. मुख्याध्यापक किशोर कदम यांनी परसात,शेतरानात,माळावर उगवनाऱ्या या रानभाज्यांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी.त्यातील पोषक जीवनसत्वे,खनिजे,उपयुक्तता याचं ज्ञान आजच्या पिढीला व्हावे.हा या प्रदर्शनाचा हेतू विषद केला .दुर्वाअपराज (सुरण , )मनस्वी अपराध (चवईचेबोंड ),धृव जाधव (टाकळा )तन्मय राणे (कुरुडू) जागृती येंडे (शेवग्याचा पाला),चैतन्या आलव (फोडशी )भूमी कदम (अळू )तन्वी मोहिते (अळू) इशिका तांबे (शेवग्याचा पाला )मानवी वंडर (शेवग्याचा पाला )वैष्णवी आलव (अळू )गार्गी चव्हाण (ओव्याची पाने) लावण्या परब( भारंगी) अथर्व आलव (भारंगी )गंधार चौकेकर (पेवगा) चैत्राली चौकेकर (भारंगी) प्रांजली राणे (शेवग्याचा पाला )तुषार डुकरे (अळू )लजांवती सालवी (अळू )राशी मोहिते (कुरुडू )आर्या चव्हाण (कुरुडू) यांनी भाज्यांचा मांडणी केली.या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग छान लाभला.दुपार सत्रात पोषण आहारात मुलांनी रानभाजीचा आस्वाद घेतला.यावेळी पालक उपस्थित होते. मान्यवरांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर कदम, सुत्रसंचलन श्रीम. प्रमीता तांबे तर आभार राजश्री तांबे यांनी मानले.