Home स्पोर्ट रविवारी ६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे मुक्ताई ॲकेडमी तर्फे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे...

रविवारी ६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे मुक्ताई ॲकेडमी तर्फे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन!

205

सावंतवाडी प्रतिनिधी: मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा २० वर्षाखालील मुलगे आणि १२ वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात येणार आहे.

मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी जेल समोर,

पहिल्या गटात पाच आणि दुस-या गटात चार क्रमांकांना रोख बक्षीसे, चषक/पदक, प्रशस्तीपत्र देण्यात येतील.तसेच १० आणि ८ वर्षाखालील मुलांमध्ये विजेते निवडण्यात येणार आहेत. स्पर्धा काही फे-यांमध्ये खेळविण्यात येईल.स्पर्धेसाठी मर्यादित स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.सहभाग घेणा-या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील.नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर मो.क्र. 8007382783 यावर संपर्क करावयाचा आहे.