मसुरे प्रतिनिधी: बांदिवडे पालयेवाडी येथील नागेश हरिश्चंद्र परब ( ४३ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. शेती करण्या बरोबरच खाजगी लक्झरी बसवर ते चालक म्हणून काम करायचे. गावातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. दिलदार व परोपकारी वृत्तीने ते सुपरिचित होते. आपल्या कामाच्या माध्यमातून मोठा मित्रपरिवार त्यांनी जोडला होता. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, विवाहित बहिणी, भावोजी, असा परिवार आहे. बांदिवडे स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.