सावंतवाडी प्रतिनिधी: वाढत्या लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी आसोली ग्रामपंचायत कडून गुरांना मोफत लसीकरण करण्यात आले. आसोली गावात लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आज पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर डी.एस. वेंगुर्लेकर यांच्या सहकार्याने मोफत लसीकरण करण्यात आले. यावेळी त्यांचे सहकारी परिचर श्री चोडणकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गावडे आणि आसोली, जोसोली फणसखोल वाडीतील शेतकरी उपस्थित होते.
लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे उर्वरित राहिलेल्या जनावरांना लसीकरण हे लस उपलब्ध झाल्याबरोबर करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर डी.एस. वेंगुर्लेकर यांनी सांगितले. या मोफत लसीकरण मोहीमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि सहकार्य मिळाले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या काढून मिळालेल्या सहकार्याचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या काढून आभार मानन्यात आले.