Home स्टोरी चौकुळ येथील बेरड समाजाच्या लोकांना आता जातीचे व शैक्षणिक दाखले थेट वस्तीवरच...

चौकुळ येथील बेरड समाजाच्या लोकांना आता जातीचे व शैक्षणिक दाखले थेट वस्तीवरच उपलब्ध होणार!

143

सावंतवाडी प्रतिनिधी: तालुक्यातील चौकुळ येथील बेरड समाजाच्या लोकांना आता जातीचे व शैक्षणिक दाखले थेट वस्तीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सावंतवाडी तहसीलदारांची टीम कालपासून कार्यरत झाली आहे. संबंधित लोकांच्या वस्तीवर जाऊन संबंधितांना दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.