Home स्टोरी महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील काही भागात पावसाचा जोर कमी होणार!

महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील काही भागात पावसाचा जोर कमी होणार!

155

२९ जुलै वार्ता: महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील काही भागात पावसाचा जोर कमी होणार आहे तर शनिवारनंतर पूर्वेकडील राज्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे गेले दोन आठवडे राज्याला पावसाने झोडपले आहे. गुरुवारीही विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत रेड तसेच ऑरेंज अलर्ट होता. या पावसाने जुलै महिन्याचीही सरासरी ओलांडली असून, अनेक भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांनंतर या पावसाचा जोर कमी होणार आहे.