Home स्टोरी महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीचे दायित्व राज्यशासन उचलेल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीचे दायित्व राज्यशासन उचलेल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

145

२९ जुलै वार्ता: राज्यशासन महिलांसाठी ९९ हून अधिक योजना आणणार आहे. राज्यात एकूण ५४ सहस्र महिला बचत गट आहेत. यामध्ये ६० लाख महिला जोडलेल्या आहेत. या सर्व बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘युनिटी मॉल’ ही संकल्पना शासन राबवणार आहे. बचत गटांच्या वस्तूंची विक्री करण्याचे दायित्व राज्यशासन उचलणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महिला बचत गटांनी केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येईल. या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य भाव मिळणे याचे दायित्व सरकार घेणार आहे. बचत गटांसाठी सरकार पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देईल.’’