Home स्टोरी माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते मळगाव हायस्कूल येथे...

माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते मळगाव हायस्कूल येथे वह्या वाटप!

209

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून मळगाव हायस्कूल येथे आज माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. शाळेच्या एकूण ४९६ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी उपस्थित संदीप गावडे मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी सभापती राजू परब, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख नीलकंठ बुगडे, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, मळगाव हायस्कूल चेअरमन मनोहर राऊळ, समिती सदस्य रामू केळुस्कर, दीपक जोशी, मळगाव हायस्कूलचे प्राचार्य फाले सर, भगवान रेडकर, गुरुनाथ गावकर, पत्रकार सुखदेव राऊळ आधी उपस्थित होते