Home स्टोरी सह्याद्री फाउंडेशनचा मानसून महोत्सवाचा निमित्ताने व सुनील राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णालयातील रुग्णांना...

सह्याद्री फाउंडेशनचा मानसून महोत्सवाचा निमित्ताने व सुनील राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप!

298

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना काय मदत करता येईल का? यासाठी आपले प्रयत्न राहतील. रुग्णालयातील सर्व रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे सैनिक पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर व सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्पष्ट केले. यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप माजी नगराध्यक्ष संजू परब व फाउंडेशन चे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रुग्णांना फळांचे वाटप करतांना सर्व पदाधिकारी

सह्याद्री फाउंडेशनचा मानसून महोत्सवाचा निमित्ताने व सुनील राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सावंत, फाउंडेशनचे कार्यवाहक ॲड संतोष सावंत, सचिव प्रताप परब, माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे, माजी सचिव सुहास सावंत, हर्षवर्धन धारणकर, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, खजिनदार गजानन बांदेकर, आंबोली सैनिक स्कूलचे अधिकारी दीपक राऊळ, कलंबिस्त दुग्धविकास संस्थेचे संचालक तथा माजी पोलीस पाटील दत्ताराम कदम आधी उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य दृष्ट्या काय सुविधा आहेत आणि काय सुविधा करायला हव्यात यासंदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने डॉक्टर संदीप सावंत यांच्याकडून माहिती करून घेतली. यावेळी ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या,त्यांना जी काही सहकार्य मदत करता येईल ते आमच्या माध्यमातून केले जाईल,असे संजू परब यांनी स्पष्ट केले. यावेळी रुग्णांशी संवादही साधण्यात आला.