Home राजकारण “त्यांनी ऐकून घेतले, पण… ! ” ; शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले...

“त्यांनी ऐकून घेतले, पण… ! ” ; शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ?

258

१६ जुलै, मुंबई वार्ता : राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळविण्याची धडपड सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्य मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ होते. बंडखोरीनंतर प्रथमच ही भेट झाली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली होती.
जुन्या पवारांनी सर्व काही ऐकून घेतले, पण उत्तर दिले नाही. त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले “आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. पवारांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो. त्यासाठी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावे. पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचे जे मत होते, विनंती होती ते ऐकून घेतली. उद्यापासून राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील.” असेही ते म्हणाले.