१६ जुलै, मुंबई वार्ता: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे राषट्रवादीतील आमदारांची द्विधामनस्थिती समोर येत आहे. तर अनेक आमदार अजित पवार यांच्या गटात गेले. तर काही आमदार हे शरद पवार यांच्याच गटात आजही आहेत.
आता पुन्हा फक्त ७ दिवसात काही आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवार यांचे संख्याबळ कमी होत चालले आहे. त्यांचा एक एक आमदार हा फुटुन अजित पवार यांच्या सोबत जात आहे
आतापर्यंतचे संख्यबळ पाहिल्यास अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार आहेत. तर शरद पवार गटाची संख्या १३ आमदारांपुर्ती मर्यादित झाली आहे.