Home स्टोरी नंदिनी आंबेरकर शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यात तृतीय!

नंदिनी आंबेरकर शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यात तृतीय!

143

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): जि.प. प्राथमिक शाळा मसुरे कावा प्रशालेची विद्यार्थ्यीनी कु.नंदिनी अरुण आंबेरकर ही जिल्हा सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये मालवण तालुक्यात तृतीय आणि जिल्ह्यात २३ वी आली आहे. तिच्या यशा बद्दल शाळा मसुरे कावा आणि शाळा व्यवस्थापन समिती मसुरे कावा मार्फत तिचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, उपाध्यक्ष सौ.सावली कातवणकर, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अरुण आंबेरकर, सदस्य सचिन राणे, मुख्याध्यापक सौ.सुखदा मेहेंदळे, सहशिक्षक सुहास गांवकर आदी उपस्थित होते.