Home राजकारण विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचाच होईल ! नाना पटोले

विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचाच होईल ! नाना पटोले

186

१४ जुलै, वार्ता : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन १७ तारखेपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षात काँग्रेसचे जास्त आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायला दिल्लीत आलो असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाना महाराष्ट्रासाठी टार्गेट दिलेलं असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादीकडे ४४ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदही आम्हालाच मिळणार. मोदी-फडणवीसांची हवा खराब झाली म्हणून अजित पवारांना आयात केल्याचा आरोप पटोलेंनी केला.