१४ जुलै वार्ता: देवेंद्र फडणवीस म्हणतात मी राजकारणी आहे आणि राजकारणात असले निर्णय घ्यावे लागतात; मात्र मी काँग्रेससोबत जाणार नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय वेगळा पक्ष आहे का? खरेतर यांना राज्याच्या भूत-भविष्याशी काहीही देणे-घेणे नाही; मात्र महाराष्ट्रातील जनतेने विचार करायला हवा. तुम्ही कुणाचे वारस आहात ? या भूमीतील शूरांनी देशावर राज्य केले आहे. त्यांनी या देशातील जनतेला कसे वागावे? कसे बोलावे? कसे रहावे?, हे शिकवले.आज त्याच राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून ‘महाराष्ट्रातील जनता किती वेडी आहे. असले राजकारणी निवडून आणते’, अशी प्रतिक्रिया देशात व्यक्त होत आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. चिपळूण शहरातील अतिथी सभागृहात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
Home राजकारण वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले! मनसे अध्यक्ष...







