Home स्टोरी मोती तलावामध्ये पडलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात यश!

मोती तलावामध्ये पडलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात यश!

376

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील मोती तलावामध्ये येथीलच खासगीलवाड्यातील रहिवासी वयोवृद्ध महिला तलावाच्या पाण्यामध्ये पडून झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. हि महिला सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरत असतांना येथील नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी प्रसंग ओळखून धावा धाव करून तलावातील होडीच्या साह्याने तिला पाण्यातून बाहेर काढून वाचवले.

त्याप्रसंगी मॉर्निंग वॉक साठी आलेले पोलीस नाईक तसेच माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आज्या मांजरेकर, संजय मापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, राऊळ तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर आणि जगदीश दूधवडकर व इतर नागरिकांनी वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करून अखेर तिला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्या वृद्ध महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले.