Home स्टोरी कल्याण पूर्व -मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन!

कल्याण पूर्व -मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन!

191

कल्याण प्रतिनिधी:(डॉ. प्रकाश कांबळे): कल्याण पूर्व येथे मानवाधिकार संघटनेच्या कार्यलयाचे उद्घाटन आदर्शम ह्युमन राईट्स फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय नागेश शिर्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ संजय नागेश शिर्के हे आणि डॉ प्रकाश यशवंत कांबळे हे गेली दहा ते बारा वर्षे कल्याण येथून संपूर्ण महाराष्ट्रभर मानवाधिकाराची जनजागृती कार्य करत आहेत. कोरोना काळात आणि शासनाच्या निकशा प्रमाणे सोसायटी कायद्याच्या नुसार नोंदनी कृत ह्युमन राईट्स संस्थावर बॅन आले त्यामुळे आदर्शम ह्युमन राईट्स असोशिएषन च्या कामात थोडी गती मंदावली होती. त्यामुळे डॉ. प्रकाश कांबळे यांनी काॅस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोशिएषन ही कंपनी कायद्यानुसार एम.सि ए.अफ्रेंस मधून नोंदणी केली आणि कार्य करण्यास सुरुवात मार्च २०२२मध्ये केली आणि मुळ संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी डॉ. संजय नागेश शिर्के यांच्या सोबत पुन्हा आदर्श ह्युमन राईट्स असोशिएषन च्या नावात बदल करून में २०२२ मध्ये तीच कंपनी कायद्यानुसार नोंदणी करून आपली पहिली एन .जि.ओ पुन्हा डॉ संजय नागेश शिर्के यांच्या बरोबर राहून गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले. आदर्श च्या ऐवजी आदर्शम ह्युमन राईट्स फाऊंडेशन या नावाने प्रसिद्ध करून अनेक कार्य करण्याची कसोशीने प्रयत्न केले. ती भरभराटीला येई पर्यंत डॉ. प्रकाश कांबळे यांनी आपल्या काॅस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोशिएषन च्या कार्यालयाचे नियोजन थांबवले होते. परंतु संघटनेच्या सहकाऱ्यांना संघटनेच काम करणे जड जात असल्याचे जाणून आपले कार्यालय असणे आवश्यक आहे. आणि विचार करून दोन्ही संघटना सांभाळता येईल या हेतूने जवळच कार्यालयाचा बेत आखला आणि त्याचे उद्घाटन समारंभ आयोजित करून आपल्याला शिनियर असलेल्या मानवाधिकार संघटनेचे संचालक अध्यक्ष डॉ. संजय नागेश शिर्के यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. तो आज यशस्वी पणे पार पडला.

संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात संघटनेचे अनेक सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय आदर्शम ह्युमन राईट्स फाऊंडेशन चे अनेक सहकारी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला आवर्जून सर्वश्री आद. मिळींद बेलमकर साहेब, जयराज पवार साहेब, प्रशांत बनसोडे साहेब, रघूनाथ गुठाळ, राजेंद्र मगर, दीपक कुंभार, जयवंत जाधव, विशेश श्रीमती सुमती बाई यशवंत कांबळे या डॉ प्रकाश कांबळे यांच्या मातोश्री व बंधू श्री प्रवीण कांबळे यांनी हजेरी लावली. डॉ. संजय नागेश शिर्के यांचे औंक्षण करून फित कापण्यात आली. व पुढे दिप प्रज्वलीत करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली डॉ संजय नागेश शिर्के साहेब यांच्या दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून ते आपल्या शुभेच्छा देऊन निघुन गेले सदर कार्यक्रमात शक्यतेवढ्या सभासद पदाधिकारी यांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलेसदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कांबळे, नितीन घोक्षे, उषाताई राणे,किशोर खरात, अंजली कांबळे जंगबहादुर यादव, मुकेशचंद्र शर्माजी, यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमास अरूणाताई गोफणे, एड.बालाजी कांबळे, नितीन म्हाडगुत, संजू ढाबी, अविनाश ठाकूर, आरिफ मोमीन, अंबिया शेख कविता भालेराव, कविता बमनालीकर उपस्थित होते. सर्वांचे यथोचित सत्कार व आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.