Home स्टोरी कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप!

कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप!

272

सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकांना रेनकोट!

कल्याण प्रतिनिधी(आनंद गायकवाड): – गेली १५ वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण पूर्वेतील मातोश्री गुंजाई फाऊंडेशन या सेवा भावी संस्थेच्या माध्यमातूच आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कल्याण पूर्व परिसरातील ८०० हून अधिक जेष्ठ नागरीक आणि महिलांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या छत्री वाटप कार्यक्रमास शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मातोश्री गुंजाई चौकातील भानुशाली हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या छत्र वाटप कार्यक्रम समयी उपस्थित जेष्ठांना मार्गदर्शक करतांना महेश गायकवाड यांनी सांगितले की, निसर्गधर्मानुसार कोणत्याही मानवाला आपले वय थांबवून ठेवता येत नाही. जसजसे वय मोठे होते, तसतसे माणूस अनुभवाने अधिक सक्षम होत जातो, याच अनुभववाचा फायदा युवा पिढीने जेष्ठांकडून घेवून आपले आयुष्य सुखकर केले पाहिजे, याच भावनेतून जेष्ठांचा सन्मान आणि त्यांना अल्पशी छत्रछायेची मदत म्हणून गेली १५ वर्षे छत्री वाटप करण्यात येत आहे. ऐंशी टक्के समाज कारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण राबवून जन सामान्यांची सेवा करण्यात महेश गायकवाड आघाडीवर आहेत म्हणूनच त्यांना जेष्ठांचा आशिर्वाद मिळत आहे असे विचार या समयी महिला आघाडीच्या पुष्पाताई ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. गुंजाई फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड आणि शाखा प्रमुख प्रशांत बोटे यांच्या आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक सुरक्षा रक्षक तसेच रिक्षा चालक यांना रेनकोटचे विनामुल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक कल्याण धुमाळ, पुष्पाताई ठाकरे, सारीका ताई जाधव, संगीता ताई गायकवाड, सुशीला ताई माळी, युवासेना शहरप्रमुख रोहित डुमने, मधुर म्हात्रे, तेजस देवकते, रितेश राजपूत, कृष्णा पाटिल, शंकर पाटिल, प्रशांत बोटे, शिवदास गायकवाड मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक व महिला आघाडी उपस्तीत होते.