Home स्टोरी बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

241

७ जुलै वार्ता: २ जून रोजी ओरिसातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २९० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती. या बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना अटक केली आहे, वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना कलम ३०४ आणि २०१ सीआरपीसी अंतर्गत अटक केली आहे.