Home राजकारण राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली!

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली!

99

७ जुलै वार्ता: ‘मोदी’ आडनाव बदनामी प्रकरणी शिक्षेस स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळला जातो. राहुल गांधींवर किमान १० गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.’उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, राहुल गांधी यापुढे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत, तसेच ते त्यांच्या खासदार पदावरील निलंबन मागे घेण्याची मागणी करू शकणार नाहीत. राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व आधीच गेले आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी करताना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.