कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- कल्याण पूर्वेतील प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या नियोजित ‘यु टाईप’ रस्त्याच्या रुंदीकरणाबाबच्या प्रक्रीयेला वेग आला असून या प्रक्रीये अंतर्गत ज्या बाधीतांनी रुंदीकरण संदर्भात हरकती नोंदवील्या आहेत त्या बाधीतांनी प्रभाग ४ जे कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सुनावणीस हजर रहाण्याचे आवाहन महापालिकेच्या सहाय्यक संचालक, नगर रचना विभागाकडून फलकाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. अशाच आशयाच्या जाहिर नोटीसचा फलक तिसगांव नाक्यावर लावण्यात आला आहे. प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या महापालिकेच्या विकास आराखड्यातील सेक्टर १ व ४ मौजे कल्याण, काटेमानिवली – तिसगांव मधील सद्या अस्तित्वात असलेला १२ मी. व १५ मी. यु टाईप रस्त्याचे २४ मीटर इतके रुंदीकरण करणे नियोजित आहे. या रस्त्याच्या रुंदीकरण फेरबदलासाठी १९ एप्रिल २०२३ रोजीच्या दै. जनमत, पुण्यनगरी, मिड डे या वृत्तपत्रात जाहीर सुचना देण्यात आली होती. या सुचनेस अनुसरून बाधीत नागरीकांनी हरकती आणि सुचना नोंदविल्या होत्या. त्या नंतर ३० मे २०२३ रोजी संबंधीतांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या बाबत अनेक नागरीकांनी हरकती तसेच सुचना नोंदवील्या आहेत .याच अनुषंगाने दि १० जुलै २०२३ ते १२ जुलै २०२३ दरम्यान दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रभाग ४ जे कार्यालयात सुनवणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या सुणावणीस संबंधीतांनी योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह उपस्थित रहाण्याचे आवाहन महापालिकेच्या नगररचन विभागा कडून करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर बाधीतांचे कशा प्रकारे पुनर्वसन होणार आहे आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग कशा प्रकारे मार्गी लागणार आहे हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.