Home राजकारण भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी ...

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे चे शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड!

159

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे मेढा वाडी चे सुपुत्र अखिल भारतीय कॅरम फेडरेशन चे उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मान्यतेने व पालक मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, माजी आमदार राजन तेली, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, आमदार नितेश राणे, यांच्या नेतृत्वाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. बाळासाहेब गोसावी यांनी यापूर्वी भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामकाज केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावेळी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बाळा गोसावी हे अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच कै. नारायण शांताराम गोसावी चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत असून मसरे परिसरासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे गावातून आणि परिसरातून अभिनंदन होत आहे.