Home राजकारण भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी शांताराम...

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी शांताराम गोसावी व सरचिटणीस पदी मयूर चव्हाण!

139

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी रामचंद्र उर्फ बाळू कोकरे यांची तर विधानसभेतील पाचही मंडल अध्यक्ष पदाच्या निवडी जाहिर

भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मान्यतेने व माजी आमदार राजन तेली, माजी खासदार डॉ.निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केल्या निवडी जाहीर….

कणकवली: ०४ जुलै २०२३ रोजी दुपारी कणकवली येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा बैठकीत भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मान्यतेने व माजी आमदार राजन तेली, माजी खासदार डॉ. निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी संघटनात्मक निवडी केल्या जाहिर. या निवडीमध्ये रिक्त झालेले जिल्हा उपाध्यक्ष पद, जिल्हा सरचिटणीस पद व कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील पाच मंडल अध्यक्ष निवड जाहीर करण्यात आल्या. यावेळी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा भटके विमुक्त आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत जाहीर झालेल्या निवडी पुढील प्रमाणेजिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मालवण तालुक्याचे शांताराम उर्फ गोसावी व जिल्हा सरचिटणीस पदी कणकवलीचे मयूर चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तालुका मंडल अध्यक्षपदाच्या निवडी खालील प्रमाणे:

१) वैभववाडी तालुका मंडल अध्यक्षपदी मारुती मोहिते यांची फेर निवड

२) कणकवली तालुका शहर मंडल अध्यक्ष पदी शशिकांत इंगळे

३) कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्षपदी संदीप होळकर

४) देवगड तालुका मंडल अध्यक्षपदी संतोष साळसकर यांची फेर निवड

५) देवगड तालुका पडेल मंडल अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बाळू कोकरे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी देवगड तालुका पडेल मंडल अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळू कोकरे यांची निवड जाहीर करण्यात आली.संघटनात्मक निवडी झाल्यानंतर उपस्थितांना जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी, यांनी मार्गदर्शन केले संघटनात्मक बांधणी कशी करायची याबाबत जिल्हाध्यक्षांनी माहिती देऊन तालुका अध्यक्षांनी जिल्हा परिषद शक्ति केंद्रप्रमुख पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख व गावनिहाय बूथ प्रमुख निवडी करून पुढील संघटन वाढवण्याकरिता प्रयत्नशील राहावे असे सांगत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या बैठकीला भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी, जिल्हा सरचिटणीस मयूर चव्हाण, जिल्हा कार्यकारी सदस्य रवी चव्हाण वैभववाडी मंडल अध्यक्ष मारुती मोहिते, देवगड पडेल मंडल अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळू कोकरे, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष साळसकर, कणकवली शहराध्यक्ष शशिकांत इंगळे, कणकवली ग्रामीण अध्यक्ष संदीप होळकर कणकवली देवगड, वसंत चव्हाण, अमित गोसावी, सुरेश चव्हाण, राजू शिंदे ,विश्वजीत भिसे, अण्णाप्पा इंगळे, सागर चव्हाण, विलास चव्हाण, किरण शिंदे,अक्षय शिंदे,सुनील तनवरे, हर्षद चव्हाण, सदाशिव माने, राजू इंगळे व कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.