Home क्राईम वरळी ‘सी फेस’ परिसरात आढळला हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह!

वरळी ‘सी फेस’ परिसरात आढळला हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह!

217

मुंबई: वरळी ‘सी फेस’ वर गोणीत तरुणीचा मृतदेह सापडला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. सदरील तरुणीचं वय १८-२० वर्षांच्या दरम्यान होतं. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञाताविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वरळी कोळीवाडा येथील आयएनएस राहताचा पाठीमागे काल संध्याकाळी मृतदेहाची गोणी काही लोकांना आढळून आली. गोणीत तरुणीचे हायपाय तोडून भरलेले होते आणि त्याचा उग्र वास सुटला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणीची अद्याप ओळख पटली नसून तिचं वय अंदाजे १८ ते २० या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.