Home स्टोरी भक्तिमधून प्राप्त शक्तीचा अभ्यासात वापर करा!

भक्तिमधून प्राप्त शक्तीचा अभ्यासात वापर करा!

151

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे शैक्षणिक साहित्य वाटपस्वामीरत्न नंदकुमार पेडणेकर, समाजसेवक पुरस्कार प्राप्त विनोद आईर यांचा सत्कार….

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): भक्ती मधून शक्ती प्राप्त होते. या शक्तीचा वापर अभ्यासात करा व जीवन सुंदर बनवा.यशस्वी होण्यासाठी झोकून ध्या, मनात दृढ निश्चय करा, जीवनात ध्येय मोठी ठेवा.निरपेक्ष विचाराने सेवा करा. तुमच्या विचारात, कर्तृत्वात स्वामी असतील तर तुम्ही तुमचे काम यशस्वी पूर्ण कराल असे प्रतिपादन शिरगाव हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांनी येथे केले. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या वतीने दहावी, बारावी, पदवी परीक्षेतील सुमारे ८० गुणवंत विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव व अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, गाव समिती सचिव विनोद आईर, गाव समिती अध्यक्ष देवेंद्र सतरकर, सेवानिवृत्त वन अधिकारी संजय कदम, सौ सुप्रिया कदम, श्री जाईल, श्री पांचाळ, प्रदीप हरमलकर, श्री मुणगेकर, तात्या निकम, हभप विजय राणे,नाना घाटावकर, स्वप्नील लोके, अनंत जंगम,मारुती जंगम आदी उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी यांच्या वतीने नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून स्वतःचे व गावचे नाव रोशन करावे असे नितीन म्हापसेकर म्हणाले. यावेळी अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर व समाजसेवक पुरस्कार प्राप्त विनोद आईर, तसेच अध्यक्ष प्रभाकर राणे आणि अन्नदान साठी भरीव योगदानाबद्दल वन अधिकारी संजय कदम यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन नितीन म्हापसेकर यांनी केले.