Home स्टोरी गुरू वीण जगी थोर काय! पळसंब शाळा न. १ मध्ये गुरुपौर्णिमा...

गुरू वीण जगी थोर काय! पळसंब शाळा न. १ मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात.

179

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): पळसंब शाळा न. १ मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमेच पुजन व पुष्पहार माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते करण्यात आले. त्यानतंर पळसंब शाळा येथे कामगिरीवर आलेल्या सौ. बागवे मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भक्ती गीतांची मैफिल रंगली. मुख्याध्यापक श्री . विनोद कदम यानी तबला साथ व सौ. पवार मॅडम हार्मोनियम वादन करत साथ दिली. कु .दिव्या परब व सानिका सावंत हिने माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांना औक्षण करत गुरुवंदना घेतली. त्यावेळी श्री. गोलतकर यांनीपरमात्म्याला ज्याने ही सृष्ठी निर्माण केली. आई वडीलांनी ज्यानी मला जन्म दिला. गुरुवर्यानी ज्यांनी विद्या दिली. आपल्या सर्वाना ज्यांच्या मुळे या जगण्याचा अर्थ मिळाला या सर्वाना माझ्या कडून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाळा अध्यक्ष श्री रविकांत सावंत, उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाध्यपूजन करत गुरुवंदना घेतली. त्यावेळी पालक माता सौ. अमृता वने, सौ. प्रिया चव्हाण, सौ. नदिनी लाड, नमीता सावंत, आशा पळसंबकर, सानीका सावंत, काजोल मुणगेकर, सविता जंगले, गौरी परब, रुपा सावंत, शाळेतील मुले, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.