Home स्टोरी कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होणार शिवजयंती….

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होणार शिवजयंती….

68

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे रविवारी १९ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिनानिमित्त या दिवशी सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होतो. पण साहित्य कोकण मराठी परिषदेच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे.

सावंतवाडीतील इंदिरा गांधी व्यापारी संकुल मधील पत्रकार कक्षात सकाळी दहा वाजता शिव पुस्तक पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिन सोहळा व यावेळी अंगाई गीत व कविता सादर करण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर आदींनी केले आहे