Home स्टोरी सावंतवाडी नगरपरिषदेची रुग्णवाहिकेचा वर्षभरापासून वापर नाही!

सावंतवाडी नगरपरिषदेची रुग्णवाहिकेचा वर्षभरापासून वापर नाही!

212

सावंतवाडी: येथील नगरपरिषदेची रुग्णवाहिका वाहन चालका अभावी वीनावापर मागील वर्षभर नगरपरिषद आवारात उभी आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका वेळेत न उपलब्द झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होतो परिणामी रुग्णांना प्राण गमवावे लागतात, हि गंभीर समस्या जाणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थानिक आमदार निधीतून मा. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वर्ष २०२२ मध्ये उपलब्द करून दिली. जेणेकरून शहरवासीयांना तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाजवी दारात उपलब्द होऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे सुलभ होईल. परंतु विकास कामावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या आणि नागरिकांकडून पाणी पट्टी , घरपट्टी कराद्वारे ५ कोटी महसूल जमा होऊनही नागरिकांच्या जीवन मरणाच्या नगर परिषदेच्या रुग्णवाहिकेला चालक नेमत नाही , य याविषयी शहर वासियांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.