२८ जून वार्ता: उद्या गुरुवार २९ जून २०२३ रोजी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची आषाढी एकादशी साजरी होत आहे. यानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून आज बुधवार २८ जून रोजी पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावरून निघणार असून, दुपारी ४:३९ वाजता ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या जनजागृती उपक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. मुख्यमंत्री आज संध्याकाळी ५ वाजता सोलापूर वन विभागानं तयार केलेल्या काॅफिटल बुकचं’च्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री पंढरपूरकडे प्रस्थान करतील. त्यानंतर ५:१५ वाजता आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप सोहळा होणार आहे.
गुरुवारी २९ जून रोजी मध्यरात्री २:३० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा सुरु होणार असून ती पहाटे ४ वाजेपर्यंत चालणार आहे.