Home स्टोरी असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन!

असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन!

427

२६ जून वार्ता: शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताह २०२३ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दिनांक २६ जून २०२३ रोजी असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुका कृषी पर्यवेक्षक श्री.नाईक, कृषी सहाय्यक पी. टी. देऊलकर मॅडम, असोली ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्निल गावडे, असोली ग्रामपंचायत सदस्या नेत्रा राणे आणि जोसोली वाडीतील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमानिमित्त बोलताना तालुका कृषी पर्यवेक्षक नाईक यांनी आपली आहार पद्धत कशी असणे गरजेचे आहे? त्याचप्रमाणे आपण शेती करताना त्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात जास्त फायदा कसा घेऊ शकतो? याचं मार्गदर्शन केलं.

कृषी सहाय्यक पी. टी. देऊलकर मॅडम यांनी कृषी विभागातल्या नवनवीन योजना काय आहेत? आणि त्यांचा आपण लाभ कसा घेऊ शकतो? याची माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिली.

शेतकऱ्यांना दापोली 2 नाचणी बियाण्याचं वितरण करतांना उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रा.पं. सदस्य स्वप्निल गावडे व ग्रा.पं. सदस्या नेत्रा राणे यांनी याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे असं सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करीत उपस्थित तालुका कृषी अधिकारी नाईक आणि कृषी अधिकारी देऊलकर मॅडम यांचे आभार मानले. सर्व शेतकरी बांधवांचे पण आभार मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दापोली 2 या नवीन नाचणी बियाण्याचं शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलं.