Home स्टोरी बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी!

बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी!

187

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची संरक्षक भिंत बिळवस वरचा वाडा येथील बाळू माधव यांच्या घरा नजीक रविवारी सकाळी खचल्याने हा छोटा

रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याबाबत रविवारी दुपारी पावसाची संततधार असतानाही बीळवस सरपंच मानसी पालव यांनी खचलेल्या रस्त्याची भर पावसात पाहणी केली. येथील ग्रामस्थ बाळू माधव आणि येथील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून खचलेल्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीसाठी आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे तसेच संबंधित सर्व अधिकारी वर्गाला ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठवून याबाबत त्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच निधी उपलब्ध होताच प्राधान्याने या ठिकाणचे काम करण्यात येईल असे यावेळी सांगितले.. तसेच सोमवारी सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे दूरध्वनी द्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे. या ठिकाणच्या कामासाठी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही सरपंच मानसी पालव मॅडम यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर या रस्त्यावरती बाळू माधव यांच्या घरा नजीक नुकत्याच सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर छोटा रस्ता खचला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

फोटो: बीळवस येते खचलेल्या रस्त्याची पाहणी करताना बिळवस सरपंच मानसी पालव आणि ग्रामस्थ…