Home शिक्षण एज्युकेशन कोकण विभाग चे प्रमोद धुरी अध्यापक महाविद्यालय येथे बीएडच्या विद्यार्थ्यांचा गौरव,...

एज्युकेशन कोकण विभाग चे प्रमोद धुरी अध्यापक महाविद्यालय येथे बीएडच्या विद्यार्थ्यांचा गौरव, स्वागत व निरोप समारंभ संपन्न!

285

सावंतवाडी प्रतिनिधी: विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये चांगलं कम्युनिकेशन सुसंवाद असायला हवा. जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये चांगलं कम्युनिकेशन ठेवून शिकवतो तो शिक्षक विद्यार्थ्याला प्रिय असतो शिक्षकाने सामाजिक भान ठेवून अध्ययन करायला हवे म्हणजे आपसूकच तो शिक्षक उत्तम शिक्षक म्हणून गणला जाईल. लोकमान्य एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी ज्या हेतूने हे अध्ययन महाविद्यालय सुरू केले आहे. त्यांचा हेतू सफल करा.आदर्श शिक्षक म्हणून समाजात वावरा असे मत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तरुण भारतचे प्रतिनिधी अँड संतोष सावंत यांनी व्यक्त केले. साळगाव येथील लोकमान्य एज्युकेशन कोकण विभाग चे प्रमोद धुरी अध्यापक महाविद्यालय येथे बीएडच्या विद्यार्थ्यांचा गौरव व स्वागत व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत, अध्यक्षस्थानी लोकमान्य एज्युकेशन विभागाचे हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य सच्चिदानंद कन्याळकर, विभाग प्रमुख ऋषिकेश जाधव हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य अमेय महाजन, प्राध्यापक मनोज सरमळकर, प्राध्यापक दिपाली गाड, प्राध्यापक मयूर सर, बिद्रे आदी उपस्थित होते. यावेळी बीएड कॉलेजच्या द्वितीय विद्यार्थ्यांचा गौरव व निरोप समारंभ निमित्ताने त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी वर्षभरात राबवण्यात आला विविध स्पर्धांचे गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण श्री सावंत यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली.

जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत,

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड सावंत पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी साळगाव सारख्या भागात b.ed अध्ययन महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयात शिकलेला विद्यार्थी हा आदर्श शिक्षक म्हणून आणि सामाजिक भान असणारा असायला हवा शिक्षक पेशा म्हणजे आपण सुसंस्कृत आदर्श विद्यार्थी घडवायला हवेत त्यासाठी त्या शिक्षकाजवळ चौफेर ज्ञान आणि सामाजिक स्तरावरील माहिती ज्ञान अवगत करायला हवे आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हवे आजच्या बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करता तुम्ही खूप काही शिकू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या अध्ययनात करा. शिक्षक होऊन शासकीय नोकरी मिळवून पैसा कमावणे हा येतो शिक्षकाच्या मनात असता कामा नये. पैशापेक्षा सामाजिक चळवळ उभारून देशाचे आदर्श नागरिक विद्यार्थी घडवणे हा हेतू मनात ठेवा .म्हणजे आपसूकच तुमचे जीवन सफल होईल आणि यशाचा मार्ग यशस्वी ठरेल असे ते म्हणाले.

यावेळी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख ऋषिकेश जाधव व प्राचार्य मनोज सरमळकर यांनी तुम्ही आता बीड शिक्षण पूर्ण करून तुम्ही शिक्षक बनला आहात तुम्ही आदर्श विद्यार्थी निर्माण करा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नवोदित शिक्षक विद्यार्थी की स्टोवन कार्डोज, वेनिता वरक, निकिता गावडे यांनी साळगाव सारख्या दुर्गम भागात हे अध्ययन महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयात आम्ही कुटुंबासारखे जसं घरात आमच्या होतं. त्या पद्धतीनेच आम्हाला येते शिकता आले. त्यामुळे हे आमचं दुसरं घर असंच आम्हाला वाटून गेलं. येथे आम्हाला दोन वर्षात खूप काही शिकता आले. येथील प्राध्यापक प्राचार्य आणि सर्व कर्मचारी स्टाफ दर्जेदार असे आहेत. त्यांची प्रेरणा आमच्यासमोर कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रसंचालन दीप्ती गावडे तर आभार नेहा कोंडये यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने अध्ययन महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाही केला नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि जे विद्यार्थी दोन वर्ष शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले त्यांचा निरोप आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

फोटो: सावंतवाडी साळगाव येथील लोकमान्य एज्युकेशन ट्रस्टच्या प्रमोद धुरी अध्ययन महाविद्यालयाच्या नवोदित शिक्षक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करताना कोमसापचे तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, बाजूला हॉटेल मॅनेजमेंट चे एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, प्राचार्य सच्चिदानंद कन्याळकर, हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य अमेय महाजन, ऋषिकेश जाधव आधी