Home राजकारण उद्धव ठाकरे सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

उद्धव ठाकरे सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

168

जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केल्या जाहीर!

सावंतवाडी: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे,युवासेना विभाग प्रमुख पदी रोहन मल्हार, निरवडे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत,युवासेना शाखाप्रमुख म्हणून मधुकर भाईडकर यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी जाहीर केली. तालुक्यात ग्रामीण भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना नेते बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब,उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना तालुका पदाधिकारी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, महिला तालुकाप्रमुख भारती कासार,मिलिंद नाईक, अशोक परब यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.