सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यावर रेल्वेनं याची दखल घेतली, आणि चौकशीचे आदेश दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.
चौकशीत १६४ बनावट तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड!
यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजाराच्या पार गेली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झालंय. या खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात आली. १८ मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. मीडियाने बातमी लावून धरल्यावर रेल्वेनं याची दखल घेतली, आणि चौकशीचे आदेश दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे