Home स्टोरी पंतप्रधानांचे मोदींच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद!

पंतप्रधानांचे मोदींच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद!

166

२३ जून वार्ता: पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी पंतप्रधानांचे मोदींचे आदरातिथ्य केले. मात्र, या दरम्यान पत्रकार रवी नायर यांनी पंतप्रधानांचे काही आक्षेपार्ह फोटो ट्विट केले आहेत. हे फोटो फेक असल्याचा आरोप करत, नायर यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

रवी नायर यांनी पंतप्रधान मोदींचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आपण डिलीट करणार नसल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत डॉ. प्राची साध्वी यांनी रवी यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

प्राची यांच्या ट्विटला उत्तर देत, रवी नायर यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. “हाय प्राची (मला तुमचं खरं नाव माहिती नाही), मात्र हे फोटो खोटे आणि फोटोशॉप असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जर हे सिद्ध केलं तर मी नक्कीच माझं ट्विट डिलीट करेल. माझं तुम्हाला हे खुलं चॅलेंज आहे. कृपया हे स्वीकारा.” अशा आशयाचं ट्विट रवी नायर यांनी केलं आहे.