Home स्टोरी तब्बल १८० देशात योगदिन साजरा!

तब्बल १८० देशात योगदिन साजरा!

223

२१ जून वार्ता: युनो ने योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज तब्बल १८० देशात योगदिन साजरा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी युनोच्या कार्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत स्टेडियममध्ये कारण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनीही योगाचे प्रात्यक्षिक केले. मी नियमित योग करतो असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.