Home राजकारण ठाकरे गटाचे शिशिर शिंदे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा!

ठाकरे गटाचे शिशिर शिंदे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा!

177

१८ जून वार्ता: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होते. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसे पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिले आहे. अशी माहिती मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटात मनासारखे काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. शिशिर शिंदे यांनी १९ जून २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केलं. माझी घुसमट मी थांबवतो, असे शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले, हि शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.