Home स्टोरी गुजरातला धडकलेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा देशाच्या हवामानावर परिणाम!

गुजरातला धडकलेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा देशाच्या हवामानावर परिणाम!

167

१७ जून वार्ता: गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशाच्या हवामानावर परिणाम झालेला असून देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सूनला आता २३ जूननंतर सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळेचक्रीवादळामुळे लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.