Home स्टोरी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून मंगलराघोनगर प्रभागात नागरी विकास कामांचा शुभारंभ!

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून मंगलराघोनगर प्रभागात नागरी विकास कामांचा शुभारंभ!

301

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या नागरी विकास निधीतून मंगलराघोनगर प्रभाग क्र ८९ मध्ये नागरीसुविधा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे .मंगलराघोनगर प्रभाग क्र ८९ च्या माजी नगरसेविका सुशिला माळी यांच्या पाठपुराव्याने ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास ‘ या योजने अंतर्गत चंद्रकांत भोईर चाळ, सांगळे यांच्या घरापासून ते एटम सर यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार तयार करणे व लेकर्ड लादी बसविणे तसेच पार्वती बाई कर्पे हॉल ते सांगळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करणे तसेच लेकर्ड लादी बसविणे या कामाचा शुभारंभ शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

या वेळी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना सांगितले की, नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरीही या प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ. सुशीला माळी या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, त्यांच्याच पाठपुराव्याने या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागरी समस्यांची जाण असलेल्या सुशीला माळी यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेही ते म्हणाले. या भूमिपूजन कार्यक्रम समयी शिवसेना शहरप्रमूख महेश गायकवाड, माजी नगरसेविका सुशिला कुंडलिक माळी यांचे सह विधानसभा क्षेत्र संघटक मंदा ताई वाजे, सौ. केशर सोनावणे, सौ. मनिषा संजय पवार, अशा पवार तसेच परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.