Home स्टोरी खरे यांचा जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला!

खरे यांचा जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला!

97

१५ जून वार्ता: तीस लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासावर संशय व्यक्त करीत कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, याप्रकरणी खरे आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. खरे यांच्या जामीन अर्जावर बुधवार दि. १४ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर खरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

खरे यांना जामीन मंजूर केल्याचा त्याचा विपरीत परिणाम तपासावर होण्याचीही शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. या साऱ्या कारणांमुळे खरे याचा जामीन अर्ज न्या. आर. आर. राठी यांनी दुसऱ्यांदा फेटाळून लावला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेंद्र बघडाणे यांनी युक्तिवाद केला. ‘लाचलुचपत’चे पैरवी अधिकारी म्हणून प्रदीप काळोगे यांनी पाठपुरावा केला.