Home स्टोरी भारतात फेसबुक बंद करू! कर्नाटक उच्च न्यायालयान इशारा.

भारतात फेसबुक बंद करू! कर्नाटक उच्च न्यायालयान इशारा.

117

१५ जून वार्ता: एका प्रकरणात तपासासाठी फेसबुक कर्नाटक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे आरोप करण्यात आले होते. यानंतर, कंपनीने जर तपासात सहकार्य केले नाही, तर भारतात फेसबुक बंद करू असा इशारा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती कृष्णा एस. दिक्षित यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला. या खंडपीठासमोर कविता या महिलेच्या प्रकरणाची कारवाई सुरू होती. या महिलेचा पती शैलेश कुमार सौदी अरेबियामध्ये काम करतो, तर ही महिला मंगळुरूजवळ एका गावात राहते. या महिलेच्या पतीने २०१९ मध्ये सीएए कायद्याच्या समर्थनार्थ एक फेसबुक पोस्ट केली होती. मात्र, कोणीतरी त्याच्या नावाने फेक अकाउंट उघडून सौदी अरेबियाचे राजे आणि इस्लामबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या. ही गोष्ट लक्षात येताच शैलेशने तातडीने आपल्या घरी सांगितलं होतं. त्यानंतर मंगळुरू पोलीस स्टेशनमध्ये कविताने याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, तिकडे सौदीमध्ये शैलेशला या पोस्टमुळे अटक करण्यात आली, आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे.