Home क्राईम पुर्ववैमनस्यातून कल्याण पूर्वेत युवकाची हत्त्या, ओरोपी पोलिसांच्या ताब्यात!

पुर्ववैमनस्यातून कल्याण पूर्वेत युवकाची हत्त्या, ओरोपी पोलिसांच्या ताब्यात!

931

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड) कल्याण पूर्वेत पूर्ववैमनस्यातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची चाकूचे वार करून हत्त्या केल्याची घटना काल रात्री ११ चे सुमारास घडली आहे. या घटनेतील आरोपीचा कोळसेवाडी पोलिसांनी तत्परनेने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ईश्वरी क्लासेस जवळ, नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर, समता नगर काटेमानिवली या ठिकणी न्यू सुदर्शन कॉलनी काटेमानिवली कल्याण पूर्व येथे रहाणाऱ्या अमोल लोखंडे या ३९ वर्ष युवकाची कंचन कॉलनी, समता नगर, काटेमानिवली येथे रहाणाऱ्या ३२ वर्षीय टक्या उर्फ जयेश डोईफोडे या युवकाने पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून जखमी करून हत्त्या केली. या घटनेची खबर लागताच कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी जयेश डोईफोडे याचा तत्परतेने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.या खूनाच्या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली करण्यात येत आहे.