Home स्टोरी येत्या ४८ तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार

येत्या ४८ तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार

208

११ जून वार्ता: येत्या ४८ तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार आलेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील २४ तासांत आणखी उत्तरेकडे सरकणार आहे.मान्सून केरळमध्ये तब्बल ८ दिवस उशिरा दाखल झाला. मात्र, पोषक वातावरणामुळे मान्सूनचा पुढील प्रवास सुकर होत चालला आहे. सध्या मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरातील काही भाग, पूर्वमध्य बंगाल, बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागरातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीमचा भाग व्यापला आहे.